
वडगाव शेरी - नगर रोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गणेशोत्सवामध्ये श्री गणेश विसर्जना करता चोवीस ठिकाणी मूर्ती संकलन आणि दान केंद्रे याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय शाडूच्या मूर्तींकरता काही ठिकाणी स्वतंत्र विसर्जन हौद असणार आहेत, अशी माहिती नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय पोळ यांनी दिली आहे.