पुणे - महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा कोला जातो. या उत्सवाला 'राज्य उत्सव’ म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत केली. या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सभागृहात जाहीर केले. यासाठी सरकारकडून शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.