पुणे - ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना गतवर्षी सलग पाच वर्षांसाठी परवानगी दिली आहे, अशा मंडळांना यंदा परवाना घ्यावा लागणार नाही. मात्र, मंडप, स्टेज आणि कमानीत बदल असल्यास त्याची माहिती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात माहिती द्यावी लागणार आहे.
कायद्याचे पालन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने २०२३ मध्ये घेतला होता. त्यानुसार गतवर्षी परवानगी घेतलेल्या मंडळांना यावर्षी परवानगी घेण्याची गरज नाही. परंतु परवानगी घेताना दिलेल्या नियम अटींचे पालन मंडळांना करावे लागणार आहे.