Police Commissioner Amitesh Kumar
sakal
पुणे - गेल्या दोन वर्षांपासून मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांना यंदा विशेष बाब म्हणून पुन्हा सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार आहे. कोरोनानंतर स्थापन झालेल्या तसेच मागील दोन-तीन वर्षांत तात्पुरत्या स्वरूपात मिरवणुकीत सहभागी होण्याची संधी मिळालेल्या मंडळांच्या सहभागाबाबत पुढील वर्षापासून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिली.