pune ganeshotsav
sakal
पुणे - आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच ध्वनिवर्धकांसंदर्भातील नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले. दरम्यान, गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवावर अनावश्यक निर्बंध लादू नयेत व उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरे होऊ द्यावेत, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली.