Dj Sound System
sakal
पुणे - सार्वजनिक गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्लाज्मा, प्रेशर, मिड आणि लेझरच्या वापरावर पोलिसांनी बंदी घातल्यास त्याला ‘साऊंड ॲण्ड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशन’ पूर्ण पाठिंबा देईल, अशी भूमिका असोसिएशनने गुरूवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. गणेशोत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करण्यासाठी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी यांनी यावेळी सांगितले.