
पुणे : वेगवेगळ्या लोकांच्या नावाने असलेल्या डेबीट कार्डचा वापर करुन एटीएम मशीनमध्ये पैसे भरताना तांत्रीक घोटाळा करुन पैसे न मिळाल्याचा बनाव करीत बॅंकेकडूनच पैसे वसुल करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकत मोठे रॅकेट उघडकीस आणले. आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी याच पद्धतीने बॅंकांची तब्बल 17 लाख रुपयांची फसवणुक केल्याची माहिती पुढे आली आहे. हिंगणे खुर्द, नऱ्हे, सिंहगड रस्ता यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात आरोपींनी या स्वरुपाचा "एटीएम फ्रॉड' केला आहे.
संदिपकुमार रामसनेही प्रजापती (वय 19 ), अरविंद राजाराम कुमार ( वय 24 ) अशोक राजाराम कुमार (वय 25, तिघेही रा. कानपुर, उत्तरप्रदेश) यांना 30 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. स्टेट बॅंकेच्या हिंगणे खुर्द शाखेचे अधिकारी आश्रय दीक्षित यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात 7 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत अनोळखी व्यक्तींनी बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरल्याचा बनाव करुन, त्यांना पैसे न मिळाल्याचे सांगून बॅंकेकडून 96 हजार रुपये उकळल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनीट तीनचे पथक करीत होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आरोपी असा करत होते "एटीएम फ्रॉड' !
आरोपी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने असलेल्या डेबीट कार्डचा वापर करुन एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचा प्रयत्न करत असे. ते पैसे तत्काळ काढून घेत एटीएम मशीनचे 'डिस्पेन्सर' बटन दाबून ठेवत होते. त्यामुळे व्यवहार पुर्ण होत नसे. व्यवहार पुर्ण न झाल्यामुळे पैसे मिळाले नाहीत, असे बॅंकेला सांगून बॅंकेकडून पैसे उकळण्याचे काम संबंधीत आरोपी करत होते. त्यांच्याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकास मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलिस उपनिरीक्षक गुंगा जगताप, किरण अडागळे, दत्तात्रय गरुड, गजानन गानबोटे, मच्छिंद्र वाळके, नितीन रावळ, कैलास साळुंखे यांच्या पथकाने तिघांना अटक केली. त्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी हिंगणे खुर्द,नऱ्हे, सिंहगड रस्ता यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात या स्वरुपाचा 'एटीएम फ्रॉड' करून बॅंकांना 17 लाख रुपयांना फसविल्याची माहिती पुढे आली आहे. न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
"गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने 17 लाख रुपयांच्या "एटीएम फ्रॉड'प्रकरणी तिघांना अटक केली. पैसे भरण्याच्या पद्धतीमध्ये तांत्रिक घोळ करुन नोंदणीची प्रक्रिया रद्द झाल्याचे आरोपी भासवित होते. त्यानंतर ते बॅंकेकडून पैसे उकळत होते. या स्वरुपाचा गुन्हा करणारे मोठे रॅकेट पोलिसांनी उघड केले असून त्याचा सखोल तपास केला जात आहे.''
- बच्चन सिंह, पोलिस उपायुक्त (गुन्हे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.