अखेर मोन्या गँग जेरबंद ! 

gang arrested for robbing at petrol pump and truck drivers on the highway in pune
gang arrested for robbing at petrol pump and truck drivers on the highway in pune

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कारागृहातून तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा डाव होता. मात्र गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने संबंधित गुन्हेगार व त्याच्या 'मोन्या गँग'च्या मुसक्‍या आवळल्या. महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणे व ट्रकचालकांना लुटण्यासाठी संबंधित टोळी कार्यरत होती. 

संकेत ऊर्फ मोन्या संतोष विकारे (वय 26, रा.राजीव गांधीनगर, बिबवेवाडी), अमर नंदकुमार चव्हाण (वय 28, रा.रायकर मळा, धायरीगाव), रवींद्र कांबळे (वय 24, रा सुखसागरनगर, अप्पर बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सुशील जाधव यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड हे त्यांच्या पथकासह शनिवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी जाभुंळवाडी येथील दरी पुलाजवळ काही जण जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी हॉटेल रुचिराजवळून डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. अंधार पडल्यानंतर ही टोळी तेथून बाहेर पडण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात पोलिसांनी तेथे छापा घालून पाचपैकी तिघांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून कुकरी, मोबाईल व इतर साहित्य असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली, त्यावेळी मोन्या हा संबंधित टोळीचा प्रमुख असल्याची माहिती मिळाली. मोन्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर शहरात विविध पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, पिस्तूल बाळगणे यांसह 18 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मिळालेल्या तात्पुरत्या जामिनावर मोन्या बाहेर आला. त्यानंतर त्याने पुन्हा त्याचे साथीदार जमवून आत्तापर्यंत दरोड्याचे चार गुन्हे केले. मोन्या व त्याचे साथीदारांचा महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून तो लुटण्याचा कट होता. तसेच महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना अडवून त्यांनाही लुटण्याचे गुन्हे त्यांनी यापूर्वी केले असून आताही ते त्याच प्रयत्नात असल्याची माहिती त्यांनी दिली. 

''ही गाडी मूळ मालकाला परत द्या'', चोरलेल्या स्कॉर्पिओत चोरट्यांचा 'मेसेज'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com