संतापजनक! निगडीत भरदिवसा तरुणीवर सामूहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

तरुणीच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना निगडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी : तरुणीच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना निगडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास पीडित तरुणी निगडीतील लोकमान्य टिळक चौकातून पायी चालली होती. त्यावेळी गुंगीचे औषध असलेला स्प्रे आरोपींनी तिच्या तोंडावर फवारला. त्यानंतर तोंडाला रुमाल लावून रिक्षातून तिला अज्ञात स्थळी नेले. तेथे तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang rape on Girl at nigadi in pune