खासदार शिंदे प्रतिक्रिया

खासदार शिंदे प्रतिक्रिया
Published on

सभ्य, अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्व हरपले
स्व. माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांनी आयुष्यभर समाजकारण, सहकार आणि विकासाच्या माध्यमातून सोलापूरसाठी मोठे योगदान दिले. त्यांनी केलेले कार्य कोणालाही विसरता येणार नाही. त्यांच्या निधनाने सोलापूरने एक सभ्य, अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्व गमावले आहे. त्यांनी बँका, सूत गिरण्या, रुग्णालये, सहकार क्षेत्र, फेडरेशन तसेच विडी कामगारांसाठी पहिल्यांदाच घरकुल योजना राबविण्यासारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभे केले. त्यांनी सहकार क्षेत्रात अनेकांना मार्गदर्शन केले. त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे.
- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री
-----------
मृत्यूनंतरही देहदानातून समाजासाठी योगदान
गंगाधरपंत कुचन साहेबांनी अनेक वर्षे सोलापूरची निष्ठेने सेवा केली आणि शहराचे नाव राज्यभर प्रतिष्ठित केले. सहकार क्षेत्र, हातमाग उद्योग, टेक्स्टाईल क्षेत्र तसेच सोलापूरच्या पूर्वभागाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांचे कार्य व विचार कायम स्मरणात राहतील. त्यांनी देहदान करून समाजसेवेचा आदर्शच निर्माण केला. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी कार्य करणे हेच त्यांचे ध्येय होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न कायम राहतील.
- प्रणिती शिंदे, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com