
Nilesh Ghaywal
ESakal
पुणे - कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला पासपोर्ट कोणी दिली, शस्त्र परवाना कोणी दिला यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपने आज प्रथमच या प्रकरणात समोर येऊन महाविकास आघाडीला लक्ष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर भाष्य केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी भाजपवर प्रहार करून भाजप गुंडांना वाचवत असल्याचा आरोप केला आहे.