nilesh ghaywal sachin ghaywal
sakal
पुणे - कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि पिस्तूल परवान्यामुळे चर्चेत आलेला त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्यासह इतर सात जणांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील नव्याने बांधलेल्या इमारतीतील १० सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांत नीलेश घायवळविरुद्ध दाखल झालेला हा पाचवा गुन्हा आहे.