Ganpati Murti Making in Uruli Kanchan
sakal
- सुनील जगताप
उरुळी कांचन - १८ दिवसांवर आलेल्या गणेशउत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग सुरु झाली असून, उरुळी कांचन हे सुबक व सर्वांगसुंदर आणि विविध २०० प्रकारच्या व वेवेगळ्या आकाराच्या गणेश मूर्तीसाठी पेणच्या तोडीची प्रसिध्द बाजारपेठ म्हणून विकसित झाले आहे. येथील दत्तवाडी परिसरात असलेल्या गणेश मूर्तींच्या सर्वच कारखान्यात मूर्तींना रंगरंगोटी करत शेवटचा हात मारण्यात मूर्तिकार व्यस्त झाले आहेत.