गणपतराव इंदोरे यांचे निधन
मंचर, ता. २७ : आंबेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू व यशवंत सहकारी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष गणपतराव सावळेराम इंदोरे (वय ७१) यांचे पुणे येथे निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य होते. त्यांनी शरद सहकारी बँकेचे संचालक, आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष या पदांवर उल्लेखनीय कामगिरी बजावली. चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीचे सरपंच असताना त्यांनी गावच्या विकासासाठी भरीव योगदान दिले.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी व डोंगरी भागात केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना ‘आदिवासी सेवक’ पुरस्काराने सन्मानित केले होते. माजी आमदार स्व. दत्तात्रेय वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सहकार क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर ते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माजी संचालिका अलका इंदोरे या त्यांच्या पत्नी असून, उद्योजक संजय इंदोरे हे त्यांचे पुत्र होत.
त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील प्रामाणिक, अभ्यासू व लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

