खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कचऱ्याचे ढीग; व्यावसायिकांकडून होतेय विद्रुपीकरण

निलेश बोरुडे
Thursday, 3 December 2020

खडकवासला धरणाला लागून मागच्या बाजूला लष्कराच्या ताब्यातील रस्ता आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून अत्यंत कमी प्रमाणात वाहनांची ये-जा होत असते. त्याचा फायदा घेऊन परिसरातील हॉटेल व्यावसायिक, मेडिकल, किराणा व इतर दुकानदारांकडून रात्रीच्या वेळी या परिसरात कचरा आणून टाकला जातो. दवाखान्यातील वैद्यकीय कचराही या परिसरात आणून जाळण्याचे प्रकारही सर्रास होत आहेत.

किरकटवाडी ( पुणे ): खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला पाटबंधारे विभागाच्या मोकळ्या जागेत तसेच धरणाला लागून असलेल्या रस्त्याच्या कडेने मोठ्याप्रमाणात कचऱ्याचे ढीग वाढायला लागले आहेत. परिसरातील व्यावसायिकांकडून रात्री-अपरात्री टाकण्यात येत असलेल्या या कचऱ्यामुळे विद्रुपीकरण वाढत असून दुर्गंधीही पसरत आहे.

खडकवासला धरणाला लागून मागच्या बाजूला लष्कराच्या ताब्यातील रस्ता आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून अत्यंत कमी प्रमाणात वाहनांची ये-जा होत असते. त्याचा फायदा घेऊन परिसरातील हॉटेल व्यावसायिक, मेडिकल, किराणा व इतर दुकानदारांकडून रात्रीच्या वेळी या परिसरात कचरा आणून टाकला जातो. दवाखान्यातील वैद्यकीय कचराही या परिसरात आणून जाळण्याचे प्रकारही सर्रास होत आहेत.

'कर्जफेड न करणाऱ्या थकबाकीदारांची नावे उघड करण्यास युनियन बँकेचा नकार'

कचरा टाकणारांवर किंवा या परिसरामध्ये कचरा आणून जाळणारांवर पाटबंधारे विभाग किंवा खडकवासला ग्रामपंचायतीकडून कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस कचऱ्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. वेळीच कारवाई न झाल्यास या परिसरातील कचऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो.

अवैध धंद्यांसाठी होतोय वापर...खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या पाटबंधारे विभागाच्या जागेत मोठमोठी झाडे आहेत. या जंगल सदृश्य परिसराचा उपयोग अवैध धंद्यांसाठी होताना दिसत आहे. जागेला कुंपण नसल्याने अवैध व्यावसायिक व खरेदीसाठी येणाऱ्या लोकांचा मुक्तसंचार या ठिकाणी पाहायला मिळतो.

पुणे पदवीधर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; जादुई आकडा गाठण्यासाठी चुरस​

"या ठिकाणी कचरा टाकणारांचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केला जाईल.कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतही पाटबंधारे विभागास सहकार्य करेल. खडकवासला गावाच्या बाहेरूनही इतर गावांच्या हद्दीतील व्यावसायिक रात्रीच्या वेळी धरणा मागील मोकळ्या जागेत कचरा टाकून जातात अशी माहिती मिळत आहे."
- सौरभ मते, सरपंच, खडकवासला.

"अगोदरच कर्मचारी संख्या कमी असल्याने पाटबंधारे विभागाला इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यास मर्यादा येत आहेत. तरीही एक कर्मचारी नेमून कचरा टाकणारांवर लक्ष ठेवले जाईल. कचरा टाकणारांवर पोलीस कारवाई करण्यात येईल."
- पोपटराव शेलार, स्वारगेट उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage at the back of Khadakwasla dam