इंदापूर : नगरपरिषदेच्या अटल घन वन योजने अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्क पाहणी प्रसंगी शिरढोण (ता. कोरेगाव जि. सातारा) येथील युवक
इंदापूर : नगरपरिषदेच्या अटल घन वन योजने अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्क पाहणी प्रसंगी शिरढोण (ता. कोरेगाव जि. सातारा) येथील युवक

कचरा डेपोचे रूपांतर झाले ऑक्सिजन पार्कमध्ये; कोठे ते वाचा

इंदापूर - इंदापूर शहरातील श्री नारायणदास रामदास शहा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शहा नर्सरी, नगरपरिषदेचे अटल घनवन तसेच जोतिबा माळावर पर्यावरण संतुलनासाठी कचरा डेपोचे रूपांतर झालेल्या ऑक्सिजन पार्कची पाहणी शिरढोण (ता. कोरेगाव जि. सातारा) येथील पाणी फाऊंडेशनच्या वृक्षप्रेमी युवक स्वयंसेवकांनी केली. त्यांनी शहा नर्सरीतून झाडे लावण्याच्या बोलीवर ६०० झाडे घेवून शिरढोण मध्ये इंदापूर हरित ऑक्सिजन पार्क पॅटर्न राबविण्याचा संकल्प केला. त्यामुळे इंदापूर व शिरढोण मध्ये हरित नाते निर्माण झाले आहे.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा शहा नर्सरीचे विश्वस्त मुकुंद शहा यांना पाणी फौंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांचा फोन आला. त्यांनी इंदापूर येथील ऑक्सिजन पार्क पाहण्यासाठी त्यांचे सहकारी इंदापुराला येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार शिरढोण येथील संजयशेडगे,सचिन जाधव, विजय खंडे, गणेश घोरपडे आणि त्यांच्या दहा ते बारा सामाजिक वृक्षप्रेमी कार्यकर्त्यांनी ऑक्सिजन पार्कची पाहणीकेली.  शिरढोण येथे वृक्षारोपण करण्यासाठी त्यांनी  शहा नर्सरीतून लिंब, पिंपळ, बेहडा, काटे सावर, बहावा, विलायती चिंच, आंबा, कांचन तसेच इतर विविध प्रकारची रोपे सोबत घेतली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी मुकुंद शहा म्हणाले, शहा नर्सरीने झाडे लावून जगवण्याच्या हमीवर आतापर्यंत सात जिल्ह्यात दिड लाख रोपांचे वाटप केले असून त्याचा पाठपुरावा करून एक लाखाहून जास्त रोपे जगवली आहेत. त्यामुळे सर्वत्र झाडे लावा, झाडे जगवा ही विधायक जनचळवळ बनली आहे.

इंदापूर नगरपरिषदेने टाऊन हॉलच्या पाठीमागे  15 ऑगष्ट 2019 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या अटल आनंद घनवन योजने (ऑक्सिजन पार्क) अंतर्गत 20 गुंठे जमिनीवर अडीच हजार वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. जोतिबा माळालगत कचराप्रक्रिया केंद्र आता बगीचा म्हणून ओळखले जात असून तेथे ओल्या कचऱ्यात आलेल्या व सापडलेल्या आंब्यांच्या कोया, चिंचोके,रामफळ,जांभूळ, सीताफळ व इतर बियांपासून रोपेतयारकरून छोटी रोपवाटिका तयार केली आहे. आता तेथे दुर्गंधी नसून तेथे स्वच्छताआहे.कचऱ्यात आलेल्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूंचा खुबीने वापर करून तेथे फुलझाडांचीलागवड करण्यात आली आहे.

नगराध्यक्षा अंकिता शहा, अधिकारी, पदाधिकारी आणिकर्मचारी यांनी केलेल्या कामाचा आम्हास अभिमान वाटला असून आम्ही आमच्या गावात हा उपक्रम संपूर्ण ताकदीने यशस्वी करू अशी ग्वाही संजय शेडगे आणि सचिन जाधव यांनी दिली.

इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने अल्ताफ पठाण, सहायक आरोग्य निरीक्षक अशोक चिंचकर, लिलाचंद पोळ व अटल घनवन येथील झाडांचे निगा राखणारे चंद्रकांत शिंदे यांनी झाडे संवर्धनाची यशोगाथाशिरढोणकरांना विशद केली.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com