

आळेफाटा, ता. १६ ः पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बायपास जवळील आळेफाटा रस्त्याच्या कडेला बेजबाबदार नागरिक मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यांसह घनकचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्याचा परिणाम म्हणून महामार्गावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य आणि अनारोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
अहिल्यानगर-कल्याण व पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यवर्ती आळेफाटा शहर असल्याने येथे हॉटेल व्यावसायिक वाढले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच कचऱ्याचा प्रश्न भेडसावतो. त्याचप्रमाणे रहदारीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून या महामार्गाच्या कडेला प्लॅस्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला जातो. तर, बाजूला असलेल्या खड्डयांमध्ये मटन-चिकन व्यावसायिक रोजची घाण टाकतात. ती साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरते.
या वाढत्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढल्याने संबंधित ग्रामपंचायतीकडून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करावे. तसेच, रस्त्याच्या कडेला सर्रास कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महामार्गावरील वाहनचालक व स्थानिक रहिवाशांकडून जोर धरत आहे. दरम्यान, आळे गावाच्या हद्दीत कचरा गोळा करण्यासाठी पंचायतीच्या वतीने दररोज घंटागाडी येत असताना देखील या ठिकाणी रस्त्याच्या कडेला नागरिक कचरा टाकत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.