Garbage Issue : देहूरोड बाजारपेठ परिसरात रविवारी कचऱ्याचा ढिग साचलेला दिसून आला असून, नागरिकांचे कृत्य व प्रशासनाची दुर्लक्षवृत्ती यामुळे परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला आहे.
देहूरोड : येथील बाजारपेठ परिसरात सर्वत्र कचरा पसरल्याचे दृश्य रविवारी सकाळी दिसून आले. नागरिकांनीच हा कचरा टाकल्याचे काही स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर, या प्रकाराबाबत कॅन्टोन्मेंट आणि व्यापारी वर्गही डोळेझाक करत आहे.