कोरोना पाठोपाठ आता वाघोलीकरांसमोर 'हे' नवे संकट

निलेश कांकरिया
Monday, 14 September 2020

काही बेशिस्त नागरिकांमुळे गाव वेठीस; आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर 

वाघोली (पुणे) : दारोदारी येऊन कचरा उचलण्याचे काम वाघोलीमध्ये कचरा वेचक महिला करतात, मात्र तरीही काही बेशिस्त ग्रामस्थ कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकतच आहेत. ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी आवश्‍यक त्या उपाययोजना करूनही काही ठराविक रहिवाशांच्या मानसिकतेत बदल होताना दिसत नाही, यामुळे वाघोलीकरांनो, सुधारा आता ! कचरा रस्त्यावर टाकू नका, असे म्हणायची वेळ आली आहे. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

वर्षभरापूर्वी वाघोलीत कचऱ्याची समस्या खूप बिकट होती. यामुळे नागरिक रस्त्यावर कोठेही कचरा टाकत होते. "सर्वत्र कचरा' अशी स्थिती होती. फेब्रुवारी 2020 मध्ये ग्रामपंचायतीने एका संस्थेला कचरा उचलण्याचे काम दिले. सात महिन्यांपासून या संस्थेच्या महिला दारोदारी जाऊन कचरा गोळा करीत आहेत. ग्रामपंचायतीने सर्व ठिकाणचा कचरा उचलला आहे. तेथे फलकही लावले. "येथे कचरा टाकू नये.' एवढेच काय "कचरा टाकणारा गाढव' असा फलकही लावला. कचरा उचलून त्या ठिकाणी रांगोळीही काढल्या. मात्र तरीही नागरिकांची सवय जाताना दिसत नाही. नागरिक कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकतातच. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यतः केसनंद फाटा परिसर, सिद्धिविनायक पार्क, बाजार तळ मैदान परिसर, सातव हायस्कूल परिसर, उबाळेनगर व खांदवेनगर परिसरात कचरा टाकला जातो. सध्या हॉटेल्स बंद आहेत. अन्यथा हॉटेलचा कचराही मोठ्या प्रमाणावर पडतो. आपले आरोग्य सांभाळण्यासाठी आपणच काळजी घेणे गरजेचे आहे, मात्र ती घेतली जात नसल्याने वाघोलीमध्ये दिसून येत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

ग्रामपंचायतीने सर्व ठिकाणचा रस्त्यालगतचा कचरा उचलला आहे. सध्या संस्थेच्या महिला घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात. आपले आरोग्य आपणच सांभाळले पाहिजे. "रस्त्यावर कचरा टाकणार नाही' अशी शपथच प्रत्येकाने घ्यावी.

-मालती गोगावले, उपसरपंच, वाघोली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage in Wagholi area