उद्याने, बागांचे टाळे उघडणार; काही अटींवर प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

उद्यानात येणाऱ्यांसाठी काही बंधने घालून ती उघडण्याच्या हालचाली महापालिका करीत आहे. मात्र, उद्याने उघडल्यास ज्येष्ठांसह लहान मुलांना प्रवेश नसेल, असेही सांगण्यात येत आहे. 

पुणे - लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापासून "टाळे' लागलेली उद्याने-बागांची दारे नागरिकांसाठी उघडली जाण्याची शक्‍यता असून, उद्यानात येणाऱ्यांसाठी काही बंधने घालून ती उघडण्याच्या हालचाली महापालिका करीत आहे. मात्र, उद्याने उघडल्यास ज्येष्ठांसह लहान मुलांना प्रवेश नसेल, असेही सांगण्यात येत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाच्या साथीत विविध भागांमधील 190 उद्याने बंद करण्यात आली आहेत. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी तीन-सव्वातीन महिन्यांपूर्वी ती सुरू करण्याच्या हालचाली तत्कालीन आयुक्त शेखर गायकवाड यांनी केल्या होत्या. परंतु, उद्यानांत गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या शक्‍यतेने उद्याने बंदच ठेवण्याची भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली होती. उद्यानात ज्येष्ठ आणि लहान मुले येतात, याकडे लक्ष वेधत मोहोळ यांनी उद्यानांबाबतचा निर्णय मागे घेण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. दरम्यान, आता शहरातील बहुतांशी व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे उद्याने उघडण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी बैठक होणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मैदानांवरील सरावासाठी होणार चर्चा 
उद्यानांसोबत विविध क्रीडाप्रकारांच्या सरावासाठी मैदानांवर प्रवेश दिला जाण्याबाबत महापालिका सकारात्मक आहे. यासंदर्भातही बैठकीत चर्चा होणार असून, मैदानांवर येणाऱ्यांसाठी काही मर्यादा ठेवण्यात येतील, असेही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gardens are to be opened to the public with some restrictions