

कोंढवा ः जयराज स्पोर्ट्स अँण्ड कन्व्हेन्शन सेंटर’मधील ‘राजन खिंवसरा बिलीयर्डस अँड स्नूकर अकादमीत संपलेल्या हे-बॉल जागतिक अजिंक्यपद’ स्पर्धेत पुरुष गटात विजेता ठरलेला गॅरेथ पॉट्स लक्ष साधताना.
-----------
ग्रेट ब्रिटनच्या गॅरेथ पॉट्सला सलग दुसऱ्यांदा जेतेपद
हे-बॉल जागतिक अजिंक्यपद
पुणे, ता. १६ ः बिलीयर्डस अँण्ड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडिया (बीएसएफआय) आणि अपेक्स स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तिसऱ्या ‘डब्ल्युपीए हे-बॉल जागतिक अजिंक्यपद’ स्पर्धेत गतविजेता तसेच चार वेळा ‘वर्ल्ड पूल चॅम्पियन’ ग्रेट ब्रिटनच्या गॅरेथ पॉट्सने जेतेपदाचा मान मिळविला.
कोंढवा येथील ‘जयराज स्पोर्ट्स अँण्ड कन्व्हेन्शन सेंटर’मधील ‘राजन खिंवसरा बिलीयर्डस अँड स्नूकर अकादमीत संपलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात गॅरेथ पॉट्सने या स्पर्धेत अपराजित राहिलेल्या ग्रेट ब्रिटनच्याच जॉर्डन शेफर्डचा ७-४ असा पराभव केला. टोबियास बोंगर्सकडून पराभव स्वीकारल्यानंतर ‘लुझर्स ब्रॅकेट’ म्हणजेच पराभूत खेळाडूंच्या गटातून आगेकूच करणाऱ्या गॅरेथ पॉट्सने अंतिम सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्याच्यासाठी सुदैवाची गोष्ट म्हणजे, उपांत्य फेरीत तगड्या आणि पुरूषांच्या गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला जॅक व्हेलनला पराभूत करणाऱ्या जॉर्डनला अंतिम सामन्यात आपली लय सापडली नाही. पॉटसने सुरूवातीपासूनच सामन्यावर निर्यत्रण ठेवले. ३-३ अशा बरोबरीनंतर त्याने आपला खेळ अधिक आक्रमक केला आणि याच महिन्याच्या सुरुवातीला ‘इंटरनॅशनल हे-बॉल ओपन’ स्पर्धा जिंकून आलेल्या जॉर्डनला मागे टाकले. त्याआधी उपांत्य फेरीत गॅरेथ पॉट्सने दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसन डेव्हिडचा ७-५ असा तर ग्रेट ब्रिटनच्याच जॉर्डन शेफर्डने जॅक व्हेलनचा ७-२ असा पराभव केला होता.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी वर्ल्ड पुल संघटनेचे (डब्ल्यूपीए) अध्यक्ष ईशॉन सिंग, बिलीयर्डस अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियाचे (बीएसएफआय) अध्यक्ष एस. बालसुब्रमण्यम, बीएसएफआयचे माजी अध्यक्ष राजन खिंवसरा, जयराज स्पोर्ट्स अँण्ड कन्व्हेन्शन सेंटरचे व्यवस्थापकीय ट्रस्टी डॉ. राजेश शहा, अपेक्स स्पोर्ट्सचे संस्थापक आणि सीईओ शिवम अरोरा, डब्ल्युपीएचे क्रीडा संचालक यॉगर्न सँडमॅन, महाराष्ट्र बिलीयर्डस् आणि स्नूकर संघटनेचे उपाध्यक्ष देवेंद्र जोशी, आंतरराष्ट्रीय स्नूकरपटू यासिन मर्चंट हे उपस्थित होते.
या स्पर्धेच्या पुरुष गटातील विजेत्या गॅरेथ पॉट्सला ३० हजार डॉलर्सचे पारितोषिक आणि पदक देण्यात आले.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.