‘गारवा’च्या आठवणींना पुन्हा सुरांची साथ

‘गारवा’च्या आठवणींना पुन्हा सुरांची साथ
Published on

‘गारवा’ची नवी व्हाइब; सोलापुरात पहिल्यांदाच मैफल
सुप्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे अन् कवी सौमित्र येणार २५ ऑगस्टला भेटीला

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ ः ‘गारवा’ ऐकताना कधी पाऊस आठवतो, कधी एखादी व्यक्ती, कधी एखादी जुनी आठवण... आणि कधी काहीही कारण नसताना मन शांत होतं. हाच ‘फील’ ‘लाइव्ह’ अनुभवण्याची संधी सोलापूरकरांना पहिल्यांदाच मिळणार आहे. कारण ‘गारवा हवाहवासा’ ही खास सांगीतिक मैफल २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात रंगणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर ‘सकाळ’तर्फे करण्यात आले आहे.
आजच्या ‘प्लेलिस्ट’, ‘रील्स’ आणि ‘स्ट्रीमिंग’च्या काळातही काही गाणी अशी असतात, जी फक्त ऐकली जात नाहीत, तर ‘फील’ केली जातात. ‘गारवा’ ही त्यापैकीच एक ओळख. १९९८ मध्ये आलेल्या ‘गारवा’ अल्बमने मराठी भावसंगीताला वेगळी दिशा दिली आणि त्यातील गाणी आजही नव्या पिढीच्या ‘प्लेलिस्ट’मध्ये आपली जागा टिकवून आहेत.
‘गारवा’, ‘पाऊस दाटलेला’, ‘झाडाखाली बसलेली’ अशी गाणी कानावर पडली की ‘मूड’ आपोआप फ्रेश होतो. सुप्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांचा शांत, भावस्पर्शी आवाज आणि कवी, गीतकार अन् अभिनेते किशोर कदम अर्थात सौमित्र यांच्या शब्दांनी तयार झालेलं हे ‘मॅजिकल कॉम्बिनेशन’ सोलापूरकरांना ‘लाइव्ह’ अनुभवता येणार आहे.
ही फक्त गाण्यांची मैफल नाही; ही जुन्या आठवणी आणि नव्या ‘व्हाइब’ची भेट आहे. कविता, गीतलेखन आणि अभिनय अशा तिन्ही क्षेत्रांत स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सौमित्र यांच्या कविता आणि शब्दांना मिलिंद इंगळे यांच्या सुरांची साथ या मैफलीत अनुभवता येणार आहे. त्यामुळे ‘गारवा’सोबत मोठी झालेली पिढी असो किंवा ‘गारवा’ नव्याने ‘डिस्कव्हर’ करणारी तरुणाई - दोघांसाठीही ही संध्याकाळ खास ठरणार आहे.
मैफलीला डॉ. समिरा गुजर-जोशी यांच्या निवेदनाचीही साथ लाभणार आहे. साहित्याची जाण, भाषेवरील प्रभुत्व आणि ओघवती निवेदनशैली यामुळे त्या कार्यक्रमातील गाणी, कविता आणि आठवणी यांना एक सुंदर भावनिक टच देणार आहेत.
सोलापूरकरांचा या मैफलीला आधीपासूनच जबरदस्त प्रतिसाद मिळत असून मोजकीच तिकिटे शिल्लक आहेत. त्यामुळे ‘नंतर बघू’ म्हणत थांबण्यापेक्षा या पावसाळ्यातला हा ‘म्युझिकल मोमेंट’ ‘मिस’ न करण्याचीच वेळ आहे. २५ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात भेटूया... कारण काही गाणी फक्त ऐकायची नसतात, ती पुन्हा एकदा जगायची असतात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com