बारामतीत माळेगाव कारखान्यात दुर्घटना; आठ कामगार टाकीत गुदमरले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

- पॅन टाकीची स्वच्छता करत असताना गॅस तयार होऊन आठ कामगार गुदमरले.

माळेगाव : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखान्याचा यंदाच्या ऊस गळीत हंगाम सांगता झाल्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रसामग्रीची स्वच्छता होत असताना आज अपघात झाला. एका पॅन टाकीची स्वच्छता करत असताना गॅस तयार होऊन आठ कामगार गुदमरले. त्यामध्ये दोन कामगार बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यामध्ये रामभाऊ येळे (माळेगाव), जालिंदर भोसले (निरावागज) यांचा समावेश आहे. सर्व कामगारांवर बारामती शहरातील खाजगी वैद्यकीय रुग्णालयमध्ये पुढील उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कारखान्याचे अध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे, अनील तावरे, योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, स्वप्निल जगताप, मदनराव देवकाते, नितीन सातव, सुरेश खलाटे,दत्तात्रय भोसले, बन्सी आटोळे, कार्यकारी संचालक विजय वाबळे आदींनी तातडीने या घटनेची दखल घेतली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी व जखमी कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. विशेषतः घटनास्थळी कामगार बाळासाहेब ढमाळ, सुनिल आटोळे आणि सोमा चव्हाण यांनी वेळीच जखमी कामगारांना मदत केल्याने मोठा अनर्थ टाळण्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माळेगावच्या जखमी कामगारांची नावे पुढील प्रमाणे: रामभाऊ येळे( माळेगाव), जालिंदर भोसले (निरावागज ), राजेंद्र तावरे (सांगवी), सुनील पाटील (टेंभुर्णी), घनश्याम निंबाळकर( भिकोबा नगर- धुमाळवाडी), शशिकांत जगताप (पणदरे), शरद तावरे (सांगवी), प्रवीण वाघ (सांगवी).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas Leaked in Baramati Malegaon sugar Factory Many Workers Injured