गॅस पाईपलाईन आदेशनानूसारच

गॅस पाईपलाईन आदेशनानूसारच
Published on

गॅस पाइपलाइनसंदर्भातील
आदेश जारी : विनोद जळक

सातारा, ता. २६ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन पाइपलाइनसाठी प्रलंबित परवानग्या मंजूर करणे, नवीन परवानग्या २४ तासांत देणे तसेच विविध शुल्कांमध्ये सवलत देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. सांगली येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी पालिकेने शुल्क भरण्याच्या सूचना केल्या आहेत, असे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी नमूद केले.

माहिती अधिकार कार्यकर्ते मोरे यांनी जळक यांच्यावर गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा आरोप करून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याबाबत जळक म्हणाले, ‘‘श्री. मोरे यांनी कोणताही विषय असेल, तर प्रथमतः माझ्याशी चर्चा करावी. त्यातून त्यांचे समाधान झाले नाही, तर त्यांना त्यांचे पर्याय खुले असतील.’’
..........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com