

Traditional Cooking Methods Return
Sakal
निरगुडसर : सध्या सर्वत्र यात्रा हंगाम सुरू झाल्यामुळे गावोगावी हरिनाम सप्ताहाचे आयोजन सुरू असून गॅस टंचाईमुळे विविध गावातील ग्रामस्थांना पारंपरिक पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे,यातून पारंपारिक पद्धतीने शिजवले जाणारे चविष्ट भोजन मिळत असले तरी गॅसअभावी मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात आहे तसेच नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.