PMC Crematoriums Gas supply
sakal
पुणे - केंद्र सरकारच्या निर्णयामुळे प्रोपेन आणि ब्यूटेनच्या पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे गॅस टंचाई दूर झाली असल्याने शहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी गॅस दाहिन्यांचा वापर महापालिकेने सुरु केला आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या विद्युत विभाग प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.