

Political Debate Over Indian Election Process at Book Launch in Pune
esakal
पुणे : ‘‘२०२४ नंतर निवडणुकांच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करणारी पुस्तके का लिहिली जात आहेत, याचा विचार व्हायला हवा. निवडणुकांची संपूर्ण प्रक्रियाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे,’’ असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला; तर ‘‘मतदारांवर अविश्वास दाखवून मतदान यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करणे हा ढोंगीपणा आहे’’, अशी टीका राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.