

Pune Crime News: मद्यपान करून महागडी कार सुसाट चालवत येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात सिग्नलवर लघुशंका करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. गौरव आहुजा असं त्या तरुणाचं नाव असून त्याने आता माफीदेखील मागितील आहे. त्याने एक व्हिडीओ जारी करुन माफीनामा सादर केला.
मी गौरव आहुजा, माझ्याकडून पब्लिकमध्ये जे कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं. संपूर्ण जनता, पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांची मी माफी मागतो. मला एक चान्स द्या, सॉरी.
माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका. पुढच्या आठ तासात मी येरवडा पोलीस ठाण्यात सरेंडर होईल.