गौरी सजावध स्पर्धा

गौरी सजावध स्पर्धा
Published on

लोगो : सकाळ आणि अश्‍‍वमेध ग्रुपचा तसेच प्रायोजकांचा लोगो वापरवा


‘सकाळ-अश्‍‍वमेध’तर्फे भव्य गौरी सजावट स्‍पर्धा

भरघोस बक्षिसे मिळविण्याची संधी; प्रवेश शुल्क नाही, नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा, ता. ११ : महिलांच्‍या कलागुणांना, कल्पनाशक्तीला वाव देत त्‍यांना प्रोत्‍साहन देण्‍यात अग्रेसर असलेला ‘सकाळ’ आणि विविध उपक्रमांद्वारे समाजमनात ठसा उमटविलेल्या साताऱ्यातील अश्‍‍वमेध ग्रुपतर्फे यंदाही भव्‍य गौरी सजावट स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.
ही स्‍पर्धा सातारा नगरपालिकेत समाविष्ट असलेल्या भागासाठी आहे. यातील विजेत्‍या महिलांना स्‍वतंत्र आकर्षक बक्षिसे देण्‍यात येणार आहेत. स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी कोणत्‍याही प्रकारचे शुल्‍क आकारण्‍यात येणार नाही. मात्र, पूर्वनोंदणी आवश्‍‍यक आहे.

गौरी- गणपती हा महिलांच्‍या जिव्‍हाळ्याचा सण. आपल्‍या गौरीची सजावट जास्‍तीतजास्‍त चांगली व्‍हावी, यासाठी महिला कल्पनाशक्तीचा वापर करत आकर्षक सजावट करतात. महिलांच्‍या या गुणांना वाव देण्‍यासाठी या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. स्‍पर्धेत सहभाग नोंदविलेल्‍या महिलांनी केलेल्‍या सजावटीची पाहणी करण्‍यासाठी स्‍वतंत्र परीक्षण मंडळ तयार करण्‍यात येणार आहे. ही समिती गृहभेटीतून सजावट पाहणीद्वारे गुणांकन करणार आहे. परीक्षणाअंती निवडलेल्‍या विजेत्‍या महिलांना विशेष कार्यक्रमात बक्षिसांचे वितरण करण्‍यात येणार आहे.
...........
नगरपालिका हद्दीसाठी स्पर्धा
सकाळ-अश्‍‍वमेध ग्रुपतर्फे होणारी भव्य गौरी सजावट स्‍पर्धा ही सातारा पालिकेच्या हद्दीतील महिलांसाठी असणार आहे. त्यामध्ये पूर्वीच्या सातारा पालिकेतील भागाबरोबरच तसेच सातारा पालिकेत नव्याने समावेश झालेल्या, विलासपूर शाहूनगर व शाहूपुरी अशा भागांचाही समावेश असणार आहे.
.........

मोफत प्रवेश; पण नोंदणी आवश्‍‍यक
स्‍पर्धेत सहभागी होऊ इच्‍छिणाऱ्या महिलांनी सहभागासाठी अर्ज करणे आवश्‍‍यक आहे. यासाठीचे छापील अर्ज दैनिक ‘सकाळ’च्‍या पोवई नाका येथील कार्यालयात, तसेच अश्‍‍वमेध नागरी सहकारी पतसंस्‍थेच्‍या ३८०, सोमवार पेठ येथील व्‍यंकटविश्‍‍व अपार्टमेंट, न्‍यू इंग्‍लिश स्कूल चौकातील कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी राहुल पवार (मो. ९९२२९१३३४५), अश्‍‍वमेध पतसंस्‍था (७५१७४११९९९) यावर सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत संपर्क साधावा.
.............

अशी असतील बक्षिसे
सोफा सेट
आटा चक्की
वॉटर प्युरिफायर
नथी
साड्या
...............
स्पर्धेचे प्रायोजक
प्लॅनेट होम डेकोर, अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, सिटी सेंटर मोती चौक (शाखा क्रमांक १) आणि कमानी हौद (शाखा क्रमांक २), शनिवार पेठेतील वर्धमान ज्‍वेलर्स हे या स्‍पर्धेचे प्रायोजक आहेत. त्यांच्याकडून स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
..............
स्‍पर्धेसाठीचे नियम व अटी
स्‍पर्धा सातारा पालिका क्षेत्रासाठी मर्यादित
स्‍पर्धेतील सहभाग निःशुल्क
फोनवर नावनोंदणीस मनाई
समक्ष अर्ज भरणे आवश्‍‍यक
अर्जात घराजवळील स्‍पष्‍ट खूण, महत्त्‍वाचे ठिकाण नमूद करणे आवश्‍‍यक
परीक्षण मंडळाचा निर्णय अंतिम
स्‍पर्धा निकाल स्‍वतंत्रपणे जाहीर होईल.
बक्षीस वितरणावेळी अर्जासोबतची स्लीप आणणे बंधनकारक
सजावट पर्यावरणपूरक असावी.
सजावटीत थर्माकोलचा वापर नसावा.
सजावटीसाठी वीज वापर कमीत- कमी असावा.
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com