Gautam Adani
esakal
बारामती, ता. 28 : माझे मेंटॉर...या शब्दात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी (ता. 28) बारामतीतील कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणाचा प्रारंभ केल्यानंतर सभागृहात टाळयांचा कडकडाट झाला. आपले मार्गदर्शक व गुरु या शब्दात अदानी यांनी शरद पवार यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला.