…तर गौतम अदानी बारामतीकरांना मदत करतील- अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani will help Baramati development Ajit Pawar pune

…तर गौतम अदानी बारामतीकरांना मदत करतील- अजित पवार

बारामती : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे नमूद करताना आज अजित पवार यांनी भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी हेही भविष्यकाळात सीएसआरच्या माध्यमातून बारामतीकरांना निश्चित मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. बारामती नगरपालिका, माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. बारामती परिसरामध्ये सीएसआर च्या माध्यमातून अनेक कामे करण्यात येत असल्याची माहिती देताना अजित पवार यांनी हा उल्लेख केला.

ते म्हणाले, अदानी समूहाने देशामध्ये साठ हजार कोटी रुपयांचा कॉर्पस फंड निर्माण केलेला आहे. या फंडाचे व्याज आजच्या बाजार भावाप्रमाणे जवळपास साडेतीन हजार कोटीहून अधिक होते. या साडेतीन हजार कोटींपैकी काहीतरी निधी गौतम अदानी बारामतीकरासाठी निश्चित देतील. त्यांचे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटचे संबंध आहेत, बारामतीकरांच्या पाठिंब्यावर सुप्रिया सुळे व अजित पवार यांनाही महत्त्व असल्यामुळे अदानी समूहाकडून बारामतीच्या विकासासाठी या कॉर्पस निधीतून निश्चित हातभार लागेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

Web Title: Gautam Adani Will Help Baramati Development Ajit Pawar Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top