Pune: गायमुखवाडी येथे भीषण अपघात; रुग्णाला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्स चालकाचा मृत्यू
Fatal Collision Near Gaymukhwadi: जुन्नरमधील गायमुखवाडी येथे ॲम्बुलन्स आणि पिकअपच्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. गायमुखवाडी अपघात, ॲम्बुलन्स चालक मृत्यू, जुन्नर अपघात प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे.
ओतूर: जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात रुग्णाला उपचारासाठी आळेफाटा येथे घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्सच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.