
पुणे - पुणे-पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील ‘गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) रुग्णांच्या संख्येत शनिवारी वाढ झाली नाही. रुग्णसंख्या ७३ वर स्थिर आहे. तर १४ रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवास (व्हेंटिलेटर) यंत्रणेवर आहेत. दरम्यान, शनिवारी ९ संशयित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान पुण्यात अजून यामुळे मृत्यूची नोंद झालेली नाही.