GBS Desease : ‘जीबीएस’ चे ७२ टक्‍के रुग्‍ण झाले बरे; ५६ जणांवर उपचार सूरू

पुण्‍यात आतापर्यंत आढळलेल्‍या २११ 'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) च्‍या रुग्‍णांपैकी १४४ रुग्‍णांवर (७२ टक्‍के) रुग्‍णांवर यशस्‍वी उपचार झाले.
GBS desease
GBS deseasesakal
Updated on

पुणे - पुण्‍यात आतापर्यंत आढळलेल्‍या २११ 'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) च्‍या रुग्‍णांपैकी १४४ रुग्‍णांवर (७२ टक्‍के) रुग्‍णांवर यशस्‍वी उपचार झाले असून सध्‍या ५६ (२८ टक्‍के) रुग्‍णांवर उपचार सूरू आहेत. तर, ११ रुग्‍णांचा (५ टक्‍के) रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. बुधवारी एकाही नवीन रुग्‍णाची नोंद झाली नाही.

नवीन जीबीएस रुग्‍णांची संख्‍या आता कमी होत असून ही बाब दिलासादायक आहे. त्‍याचबरोबर रुग्‍णांचे बरे होण्‍याचे प्रमाण देखील चांगले वाढले आहे. सध्‍या शहर व पिंपरी चिंचवडमधील ५६ रुग्‍णांवर उपचार सूरू आहेत. दररोज तीन ते पाच रुग्‍ण बरे होउन घरी जात असून एक किंवा दोन नवीन रुग्‍णांची नोंद होत आहे. म्‍हणजेच निदान होणा–यांच्‍या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्‍णांची संख्‍या एकंदरित वाढली आहे.

याबाबत दीनानाथ मंगेशकर रूग्‍णालयाचे मेंदुविकारतज्‍ज्ञ डॉ. श्रीपाद पुजारी यांना विचारले असता ते म्‍हणाले की, या रुग्‍णांचे चांगले वैद्यकीय उपचारांचे व्‍यवस्‍थापन केल्‍याने ते बरे होउन घरी जात आहेत. बरे झालेल्‍यांची हातापायांची हालचालही होते परंतू, त्‍यांना दोन ते सहा आठवडे आजाराच्‍या तीव्रतेनुसार फिजिओथेरपी घेण्‍याची गरज पडते. दोन ते तीन महिन्‍यात ते चालू शकतात व दैनंदिन स्‍वतःचे सर्व काम करू शकतात. तर, दोन ते चार महिन्‍यात पुन्‍हा कामावर रूजू होउ शकतात. अगदी दोन टक्‍के रुग्‍ण असे असतात की त्‍यांची काहीच हालचाल होत नाही. तर, बहुतांश रुग्‍ण योग्‍य रितीने बरे झालेले आहेत.

जीबीएस’ सद्यःस्थिती -

नवे रुग्ण - ०

एकूण रुग्‍ण - २११ (पुणे शहर – ४२, शहरात नव्‍याने समावेश झालेल्‍या गावातील रुग्‍ण – ९४, पिंपरी चिंचवड – ३२, पुणे ग्रामीण – ३३, इतर जिल्ह्यातील – १०)

अतिदक्षता विभागात - ३६

‘व्‍हेंटिलेटर’वर - १६

बरे झालेले - १४४

मृत्‍यू - ९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com