भाजपबद्दल देशभरात प्रचंड नाराजी आमदार जयंत पाटील ः हर्षदा देशमुख, आसगावकर यांच्यासाठी मेळावा

भाजपबद्दल देशभरात प्रचंड नाराजी
आमदार जयंत पाटील ः हर्षदा देशमुख, आसगावकर यांच्यासाठी मेळावा
Published on: 

विटा, ता. १८ : ‘‘जेन-झी’कडून करण्यात येणारी विविध आंदोलने सरकार पोलिस आणि लष्कराच्या बळावर मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु एकमेकांची ओळख नसणारे अनेक तरुण स्वतःच्या खर्चाने एकत्र येऊन अत्यंत निकराने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारशी लढत आहेत. भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या देशात फार काळ हुकूमशाही चालणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही कारभाराविषयी देशभरात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव व जयंत आसगावकर यांना नक्की संधी द्या,’’ असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव व जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ येथील श्रेयस भवन येथे आयोजित खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्यांतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले,‘‘हर्षदा देशमुख यांचे पुणे पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यांशी जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांच्या रूपाने सर्वांना जाणून घेणारा उमेदवार महाविकास आघाडीने दिला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे जयंत आसगावकर हे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी.’’
माजी आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘‘सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीला राज्यात पोषक वातावरण आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचून त्यांचे मतदान करवून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत व महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.’’
यावेळी जयदीप यादव, विवेक कोकरे, चंद्रकांत चव्हाण, किरण लाड, देवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप मुळीक यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा पाटील यांनी आभार मानले.

फोटो ः 06307

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com