

पोस्टरमुक्त नागपूरसाठी
‘जेन-झी’ची पुढाकार
बेकायदा पोस्टर हटविण्यासाठी अभियान
नागपूर, ता. ११ : शहरातील वाढत्या बेकायदा पोस्टर आणि जाहिरातींमुळे शहराच्या सौंदर्याला मोठा तडा जात होता. हीच समस्या लक्षात घेऊन शहरातील जागरूक तरुणाईने म्हणजेच जेन-झीने ‘पोस्टर फ्री नागपूर’ हे अभियान हाती घेतले आहे. शहरातील सार्वजनिक भिंती, वीज व मेट्रोचे खांब आणि विविध दर्शनी भागांवर बेकायदेशीरपणे लावण्यात आलेले पोस्टर्स पूर्णपणे हटवून शहराला विद्रूपीकरणापासून मुक्त करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
गेल्या काही काळापासून उड्डाणपुलांचे स्तंभ, मेट्रोचे खांब, सार्वजनिक इमारतींच्या भिंती आणि अगदी झाडांची खोडेसुद्धा बेकायदा जाहिरातींनी झाकून गेली आहे. हे अनधिकृत पोस्टर्स म्हणजे शहरात पसरलेला एक प्रकारचा ‘अदृश्य कचरा’ बनले असून, रोजच्या सवयीमुळे सर्वसामान्य नागरिकही याकडे नकळत दुर्लक्ष करत आहे. अशा बेकायदेशीर जाहिरातींवर कोणतीही अधिकृत माहिती नसून केवळ फोन नंबर छापलेले असतात. या माध्यमातून अनेकदा नागरिकांची फसवणूक होणे किंवा अनैतिक घटकांचा प्रचार-प्रसार होण्याचे प्रकार घडतात. रविवारी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी आयटी पार्क परिसरातील संपूर्ण भिंतीची स्वच्छता करून तेथून शेकडो अनधिकृत पोस्टर्स काढून टाकण्यात आले. स्वयंसेवकांच्या या उपक्रमामुळे आयटी पार्क परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
-------------
कोट
आम्ही दररोज भिंतीवरचे पोस्टर्स पाहायचो. यामुळे शहराचे सौंदर्य खराब होत होते. केवळ सोशल मीडियावर तक्रार करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून बदल घडवायचा, असा निर्धार आम्ही केला. ही फक्त आमची मोहीम नसून संपूर्ण नागपूरकरांची चळवळ व्हावी, अशी इच्छा आहे.
- लोकेश थोटा, स्वयंसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.