जनरल बिपीन रावत आमच्यासाठी हीरो आहेत : लेफ्टनंट कृष्णकांत केतकर

लष्करी सेवा ही नोकरी नाही तर ती एक जीवनशैली आहे. तो एक प्राऊड मोमेंट आहे. एवढ्या कमी वयात देशसेवा करण्याची संधी इतर कुठल्याही क्षेत्रात मिळत नाही.
लेफ्टनंट कृष्णकांत केतकर
लेफ्टनंट कृष्णकांत केतकरSakal
Updated on

केडगाव : लष्करी सेवा ही नोकरी नाही तर ती एक जीवनशैली आहे. तो एक प्राऊड मोमेंट आहे. एवढ्या कमी वयात देशसेवा करण्याची संधी इतर कुठल्याही क्षेत्रात मिळत नाही. असे मत लेफ्टनंट कृष्णकांत केतकर यांनी सकाळशी बोलताना स्पष्ट केले.

एनडीएतील तीन वर्षांचे व आयएमए मधील एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर वाखारी ( ता.दौंड ) येथील कृष्णकांत धनंजय केतकर यांची थेट लेफ्टनंट पदापासून लष्करी कारकिर्दला सुरवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत काल डेहराडून येथे त्यांच्या तुकडीचे दीक्षांत संचलन झाले.

या यशाबद्दल कृष्णकांत यांचे कौतुक होत आहे. कृष्णकांत यांना लष्करी वारसा आहे. त्यांचे वडील धनंजय केतकर हे लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झाले आहेत. कृष्णकांत यांना लहानपणापासूनच लष्करात जाण्याची इच्छा होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण दिल्ली व गुवाहटी येथे झाले आहे. माध्यमिक शिक्षण सैनिक स्कुल सातारा येथे झाले. सन २०१७ मध्ये त्यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील ( एनडीए ) प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली.

एनडीएमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य ( अॅकॅडेमिक टॅार्च ) मिळविले आहे. इंडियन मिलटरी अॅकॅडमीमधील प्रशिक्षणानंतर त्यांची आर्मी एअर डिफेन्ससाठी निवड झाली आहे. धनंजय केतकर हे सध्या भांडगाव येथील टेस्टी बाईट कंपनीत नोकरी करीत आहेत. केडगाव येथील एक मित्र एक वृक्षचे ते सक्रीय सदस्य आहेत. त्यांचे मूळ गाव मेहकर ( जि.बुलढाणा) आहे. अनुराधा केतकर या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आई अनुराधा व वडील धनंजय म्हणाले, कृष्णकांतचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याचे कौतुक करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. आमचे स्वप्न त्याने पुर्ण केले.

लेफ्टनंट कृष्णकांत केतकर
अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा : नकुल बुट्टा, चंद्रभागा कचरे प्रथम

जनरल रावत सर आमच्यासाठी हीरो आहेत.

आमच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना घेण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आले होते. या समारंभात एकीकडे आनंद तर दुसरीकडे हेलिकॅाप्टर दुर्घटनेच्या दुःखाची किनार होती. रावत सर आमच्यासाठी हीरो आहेत. दीक्षांत संचलनानंतर खूप दंगा, जल्लोष असतो. पण रावत व अन्य जवांनाच्या निधनामुळे आम्ही असे काहीही केले नाही. लष्करी सेवेची मला घरातूनच प्रेरणा मिळाली. असे कृष्णकांत केतकर यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune's Prestige at Stake: Foul-Smelling Water on FC Road Sparks Public Outrage
Anushka Harke wins Teen India empowers 2026 title
AI career guidance helps students choose future-ready skills, colleges, branches, and competitive exam strategies in a rapidly changing job market.
Anil Pawar Escapes Major Injury After Sickle Attack Near Indapur Municipal Council
Marathi News Esakal
www.esakal.com