जुन्नरकरांसाठी नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय

दत्ता म्हसकर
रविवार, 12 जुलै 2020

जुन्नर पालिकेची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वसाधारण सभा

जुन्नर (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिन्यानंतर नगर पालिकेची सर्वसाधारण सभा नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे यांनी दिली. यावेळी नवनियुक्त मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांचे स्वागत करण्यात आले. या सभेत पाण्यासाठी नवीन मोटार खरेदी करणे, नगरपालिका निवृत्त कर्मचाऱ्यांचे रजा, उपदान वेतन, फंड इत्यादी रकमा देणे व वारसा हक्क आणि कर्मचारी नियुक्त करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. शहरात सुरू असलेल्या विकास कामांना मुदतवाढ देण्यात आली.

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

मुदतवाढ देत असताना कामाचा दर्जा तपासून घेण्याचे आदेश नगराध्यक्ष शाम पांडे यांनी प्रशासनाला दिले. १४ व्या वित्त आयोगातून सुमारे दोन कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली. सन २०२०-२१ साठी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सहभाग घेत शहराच्या स्वच्छतेबाबत जागरूक राहून अधिक चांगली कामगिरी करावी असे ठरले. नगरपालिकेचे मुख्य बाजारपेठेतील नव्याने बांधलेले शौचालय लोकांसाठी खुले करण्यात आले. तसेच सदाबाजार पेठ वेस व मुस्लिम समाज दफनभूमी सुमारे ४० लक्ष रुपयांच्या कामाची सुरुवात करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण... 

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी इन्शुरन्स पॉलिसी काढण्याचे व आरोग्य विभागासाठी नवीन वाहन खरेदी, स्वच्छता उपकरणे घेण्याचे ठरले. नगरपालिका विविध विभागातील भंगार साहित्याचा जाहीर लिलाव करण्याचे तसेच इंदिरा गांधी व्यापारी संकुल वरील मजला यांचे देखील ई-लिलाव करण्याचे प्रशासनाला सांगण्यात आले. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता गणेशोत्सवासाठी गरजेप्रमाणे कामे करून घेण्याचे आदेश देण्यात आले. अपंग कल्याणकारी योजनेला मंजुरी देण्यात आली. नगर पालिकेला देशपातळीवरील स्वच्छता पुरस्कार मिळाल्याबद्दल  नगराध्यक्ष व प्रशासन यांचे अभिनंदन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

व्हिडिओ कॉन्फरन्सवरील चर्चेमध्ये नगराध्यक्ष शाम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, गटनेते समीर भगत, दिनेश दुबे, जमीर कागदी, फिरोज पठाण, भाऊ कुंभार, अक्षय मांडवे, अलका फुलपगार, अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर, कविता गुंजाळ, सना मन्सुरी, अश्विनी गवळी, मोनाली म्हस्के, हजरा इनामदार, वैभव मलठणकर तसेच विभाग प्रमुख यांनी सहभाग घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्स वर घेण्यात आलेली पहिलीच सभा चांगल्या प्रकारे पार पडल्याचे नगराध्यक्ष पांडे यांनी जाहीर करत आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: General meeting of Junnar Municipality through video conference