
पुणे : जलयुक्त शिवार योजनेच्या तिसऱ्या भागात आता जिल्ह्यातील सर्व जलसाठवण बांधकामांची पडताळणी करून, त्यांना जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या विभागांकडे एकूण एक लाख वीस हजार बांधकामे असून, आतापर्यंत त्यातील दहा हजारांहून अधिक बांधकामांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले आहे. येत्या वर्षअखेर सर्व बांधकामांना जिओ टॅगिंग पूर्ण करण्यात येणार आहे.