पुणे - फळपीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘जिओ टॅगिंग’ यंदा सक्तीने तपासले जाणार आहे. फळबागेचे क्षेत्र ई-पीकपाहणीशी न जुळल्यास विमा अर्ज रद्द होणार आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.