Madhuri Misal
sakal
आळंदी - गतवर्षी आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या दिंड्यांना वीस हजार रुपये सरकारकडून दिले जाणारे अनुदान बहुतांश दिंड्यांना मिळाले नाही. याबत देवस्थानांनी यादी तयार करून दिली तर संबंधित दिंड्यांना नियमानुसार अनुदान पोहोच केले जाईल. याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील महिला वारकऱ्यांसाठी कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम जर्मन हँगरच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. याबत सकारात्मक प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला जाईल, असे आश्वासन नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे विधान भवन येथे झालेल्या बैठकीत वारकऱ्यांना दिले.