प्रमाणपत्र मिळवून बना महारेरा नोंदणीकृत एजंट

प्रमाणपत्र मिळवून बना महारेरा नोंदणीकृत एजंट

पुणे, ता. १५ : महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. तसेच ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नसेल त्यांची रेरा नोंदणी निलंबित होऊ शकते, त्यांना प्रवर्तकांसोबत काम करण्यासाठी अडचणी होऊ शकतात आणि ‘महारेरा’तर्फे दंड होण्याची शक्यता आहे. हे सर्व टाळायचे असेल व नोंदणीकृत रेरा एजंट व्हायचे असेल तर २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच येत्या सोमवारी (ता. २०) सुरू होत आहे.
संपर्क : ७३५०००१६०३

लँडस्केप डिझाईनिंग ऑनलाइन अभ्यासक्रम
‘लँडस्केप प्लॅनिंग व डिझाईनिंग बाबतचा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम शनिवारपासून (ता. १८) सुरू होत आहे. अभ्यासक्रमात झाडे, झुडुपे, वेलींचा लँडस्केपिंगसाठी शास्त्रीयदृष्ट्या वापर, मियावाकी प्लांटेशन पद्धतीचे महत्त्व, रस्ते, उद्याने, मोकळ्या जागेत लँडस्केप नियोजन, लँडस्केपसाठी बांधकाम रचना, नियोजन, साइट प्लॅनिंग व लँडस्केप प्रोजेक्ट डिझायनिंग, ऑटोकॅड सॉफ्टवेअर, पर्यावरणीय आणि कायदेशीर पैलू, औद्योगिक क्षेत्रातील जैवविविधता व तेथील प्लांटेशनचे नियम इ. विषयांचा समावेश आहे. लेखीबरोबरच प्रात्यक्षिक अनुभवासाठी विविध रचनेच्या उद्यानांना, साइट प्रोजेक्टला फिल्ड व्हिजिट असणार आहे.
संपर्क : ९८८१०९९४२६

औषधी वनस्पती लागवड व प्रक्रिया उद्योग
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षांत औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धती व त्यांच्या प्रक्रिया उद्योगाविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. १९) आयोजित केली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाईल. प्रात्यक्षिक अनुभवासाठी थेट औषधी वनस्पतींच्या उद्यानात जाऊन वनस्पतींविषयी माहिती करून दिली जाणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२


शिका मोडी लिपी
छत्रपती शिवाजी महाराजांची राजलिपी मोडी ही महाराष्ट्राची प्राचीन आणि समृद्ध लिपी आहे. पूर्वी ती शीघ्रलेखानासाठी वापरली जात असे. इतिहासातील अनेक लिखित कागदपत्रांमध्ये बंद असेलेला इतिहास वाचण्यासाठी तसेच मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी ही लिपी शिकणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. या उद्देशाने २१ मे रोजी मोडी लिपी अक्षर ओळख कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत मोडी लिपीचा इतिहास मूलभूत ज्ञान, मोडी लिपी अक्षर ओळख तसेच प्रिंटेड व इ-पुस्तकांसोबत लेखन व वाचन सरावाचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. ही कार्यशाळा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात. मोडी लिपीमध्ये लिहिण्याची वाचण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com