हडपसर गांवातून वाहणा-या कालव्याची दूरूस्ती करवी

संदीप जगदाळे
बुधवार, 30 मे 2018

हडपसर - सं.नं 79, जय भवानी नगर, गरूड वस्ती हडपसर गांवातून वाहणा-या नवीन मुळा-मुठा कालव्याची भिंत खचली असून, याठिकाणी बसवलेली संरक्षण जाळी नाहीशी झालेली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्र्याकडे सामाजिक कार्यकर्ते निलेश शिर्के यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

शिर्के म्हणाले, कालव्यात मोठया संख्येने महिला वर्ग धुणं, भांडी करण्यासाठी येतात. त्यातच कडक उन्हाळा आसल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक विशेषता छोटी मुले या कालव्यात पोहायला येतात. त्यात कलवा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. कालव्याचा कठला खचल्याने तो कधीही, केव्हाही फुटू शकतो व मनुष्यहानी होऊ शकते. पुणे महानगर पालिका म्हणते हे काम पाटबंधारे विभागाचे आहे. तर पाटबंधारे विभागाचे अधिकारी या कामासाठी निधी नसल्याचे सांगतात. त्यामुळे हे काम होत नाही. त्यामुळे याठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना होवू शकते. तीन वर्षोपूर्वी भैरबानाला येथील हाच कालवा फुटला होता व नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते.
 
Web Title: Get rid of the problems of canal that runs through the village of Hadapsar