दीड हजार सदनिकांचे वाटप बाकी

दीपेश सुराणा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पिंपरी - जेएनएनयूआरएम-बीएसयूपी योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चिखलीतील पेठ क्रमांक १७ व १९ येथे उभारलेल्या स्वस्त घरकुल योजनेत सध्या प्रमुख सुविधांची वानवा आहे. येथे रस्त्यावरच भाजी मंडई भरते आहे. रहिवाशांना शाळा, सांस्कृतिक भवन, दवाखाना, भाजी मंडई आदी प्रमुख सुविधांची गरज आहे. संबंधित प्रकल्पातील पाच हजार ४० सदनिकांचे वाटप पूर्ण झाले आहे. अद्याप एक हजार ५९६ सदनिकांचे वाटप बाकी आहे.

घरकुल प्रकल्प एकूण २५.३० हेक्‍टर क्षेत्रात आहे. त्यातील ५.७ हेक्‍टर जागेत विविध सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. येथे सांस्कृतिक भवन व ग्रंथालय इमारतीच्या पायाचे काम पूर्ण झाले आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेचे काम बाकी आहे. भाजी मंडई रस्त्यावर भरते आहे. मंडईसाठी आवश्‍यक आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बांधकाम परवानगी बाकी आहे. दवाखान्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 

घरकुल प्रकल्पात दवाखाना, शाळा, भाजी मंडई आदी सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. भाजी मंडईसाठी आम्ही यापूर्वी सहा वेळा पत्रव्यवहार केला आहे. हा प्रश्‍न लवकरात लवकर सुटायला हवा. येथे सीमाभिंत पाडून केलेले रस्ते त्वरित बंद करावेत.
- तुषार सोनवणे, अध्यक्ष, घरकुल समस्यानिवारण समिती

भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरच बसावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. येथे भाजी मंडईची सोय व्हावी. विकासकामांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर बोर्ड लावून संरक्षक भिंत उभारावी.
- किसन शेवते व अण्णा गांगुर्डे, भाजी विक्रेते

घरकुल प्रकल्पात साई चौकापर्यंत येणाऱ्या बस आता प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येतात. त्या पूर्ववत साई चौकामध्ये यायला हव्या. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग, शालेय विद्यार्थी यांची सोय होईल.
- सदाशिव थोरात, ज्येष्ठ नागरिक

घरकुल प्रकल्पातील १६८ सदनिकांची नव्याने सोडत काढली. त्यांचा बांधकाम पूर्णत्व दाखला अद्याप बाकी आहे. त्याशिवाय काही जणांकडून स्वहिस्सा रक्कम येणे बाकी आहे. ज्यांनी स्वहिस्सा रक्कम भरली आहे त्यांना बांधकाम पूर्णत्व दाखला मिळाल्यानंतर घराचा ताबा दिला जाईल. बांधकाम पूर्ण झालेल्या आणखी २०० सदनिकांसाठी महिनाभरात सोडत काढली जाईल.
- चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त

Web Title: Gharkul Project Home Distribution