

आंधळगाव, ता. १८ : न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ची ३५वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. १८) दुपारी दोन वाजता न्हावरे येथील रावसाहेबनगर येथील कन्यादान मंगल कार्यालयात होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे.
या सभेत मागील ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२५-२६चा कामकाज अहवाल, नफा-तोटा पत्रक व ३१ मार्च २०२६ रोजीचा ताळेबंद स्वीकारून मंजूर करणे, तसेच वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे, आदी विषयांवर चर्चा होणार आहे. सन २०२४-२५ च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालातील दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे, तसेच सन २०२६-२७साठी वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करून त्यांचे शुल्क निश्चित करण्याचा विषयही सभेपुढे आहे. कर लेखापरीक्षक, परिव्यय लेखापरीक्षक, ऊर्जा लेखापरीक्षक आदींच्या नियुक्त्यांबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.
सन २०२५-२६ मध्ये अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे आणि सन २०२६-२७ साठी संचालक मंडळाने सादर केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, हे प्रमुख विषय आहेत. सभेस अनुपस्थित राहिलेल्या सभासदांची रजा क्षमापित करण्याबाबतही निर्णय होणार आहे. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. कारखान्याच्या सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.