

DJ and laser lights banned in Ghodegaon Ganeshotsav.
Sakal
घोडेगाव : पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करा. कायदा सुव्यवस्थेचे पालन करून पार पाडण्यासाठी घोडेगाव पोलिस ठाणे परिसरात डीजे आणि घातक लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजविल्यास किंवा लेझर लाईट लावल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी दिला आहे.