घोडेगाव क्र. १ संस्थेकडून १५ टक्के लाभांश जाहीर

घोडेगाव क्र. १ संस्थेकडून
१५ टक्के लाभांश जाहीर
Published on

घोडेगाव, ता. १३ ः घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील घोडेगाव क्र. १ विविध कार्यकारी संस्थेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करण्याचा विषय एक मताने मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष दशरथ काळे होते.
सभेवेळी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर काळे व विजय काळे यांनी केले. यावेळी विषय पत्रिकेवरील ७ विषयांना मंजुरी देण्यात आली.
पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे यांनी संस्थेच्या १०० वर्षातील प्रगतीचा लेखाजोखा मांडला. सभासदांच्या मागणीप्रमाणे लवकरच संस्थेचे सुसज्ज कापड दुकान सुरू करण्याचे आश्वासन दिले. कैलासबुवा काळे सभापती झाल्याबद्दल व सचिव नीलेश झोडगे यांना उत्कृष्ट सचिव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेला १२ लाख ९८ हजार रुपये नफा झाला आहे. संस्थेचे भाग भांडवल ३९ लाख ७९ हजार रुपये झाले आहे. संस्थेचे कापड दुकान असून त्याला २ लाख ७३ हजार रुपयांचा नफा झाला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विकास अधिकारी संतोष काळे यांनी विविध कर्ज योजनांची माहिती दिली. चर्चेत अशोक काळे, सुदाम काळे, रामदास
काळे यांनी भाग घेतला.
सोमनाथ काळे, अशोक काळे, वसंतराव काळे यांनी आपले विचार मांडले. संस्थेचे उपाध्यक्ष दिनेश घुले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com