Ghodegaon Court : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; घोडेगावमध्ये पक्षकारांची गैरसोय, संप मिटवण्याचे वकील संघाचे आवाहन

Ghodegaon Civil and Criminal Court Employees Join Indefinite Strike : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी घोडेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप सुरू केला. संपामुळे न्यायालयीन कामकाज ठप्प झाले असून पक्षकारांची गैरसोय होत आहे.
Ghodegaon Civil and Criminal Court Employees Join Indefinite Strike

Ghodegaon Civil and Criminal Court Employees Join Indefinite Strike

esakal

Updated on: 

घोडेगाव : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी आणि अन्य न्याय्य मागण्यांसाठी घोडेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सर्व कर्मचारी आजपासून ( १७ नोव्हेंबर) राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.

आज सकाळी १० वाजेपासून न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्ववारासमोर कर्मचाऱ्यांनी शांततापूर्ण आंदोलनाचे हत्यार उपसत जोरदार निदर्शने केली, ज्यामुळे न्यायालयाचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

Loading content, please wait...