esakal | घोडेगाव ग्रामपंचायतीने घेतली सीएनजी वर चालणारी घंटागाडी
sakal

बोलून बातमी शोधा

घोडेगाव ग्रामपंचायतीने घेतली सीएनजी वर चालणारी घंटागाडी

घोडेगाव ग्रामपंचायतीने घेतली सीएनजी वर चालणारी घंटागाडी

sakal_logo
By
चंद्रकांत घोडेकर ः सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव (ता. आंबेगाव) : येथील ग्रामपंचायतीने 15 वा वित्त आयोग निधी अंतर्गत टाटा कंपनी ची सीएनजी वर चालणारी घंटागाडी घेतली आहे. यामुळे कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत या गाडीचा वापर करता येईल.

घोडेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून येथे तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन, न्यायालय, आदिवासी विकास प्रकल्प यासह 20 हून अधिक शासकीय कार्यालय आहे. सध्या कोरेगाव ची लोकसंख्या तीस हजाराच्या आसपास असून शेजारील पाच गावांचा येथे जास्त संपर्क असतो. त्यामुळे नागरी सुविधा निर्माण करताना ग्रामपंचायतला अडचणीत आहे.

ग्रामपंचायत घोडेगाव च्या पूर्वीच्या 2 घंटागाडी आहेत. पण त्याचा मेन्टेनन्स खर्च व डिझेल खर्च जास्त होत होता. तसेच गावात लोकसंख्या अनुसार ग्रामपंचायत ला घंटागाडी गरजेची होती. सीएनजी घंटागाडी मुळे इंधन खर्चात कपात होईल. गणेश आगमनाच्या मुहूर्तावर माजी सभापती कैलासबुवा काळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या प्रसंगी सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील इंदोरे, मजीद मुजावर, गणेश वाघमारे, गणेश घोडेकर, वर्षा काळे, शोभाताई सोमवंशी, राजेश्वरी काळे, सुवर्णा काळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांचे सहकार्य लाभले.

loading image
go to top