

1,254 cases settled at Ghodegaon Lok Adalat
Sakal
मंचर : घोडेगाव ( ता.आंबेगाव) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी (ता. १२) आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयास पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकन्यायालयात ठेवण्यात आलेल्या एकूण ९,९९८ फौजदारी व दिवाणी प्रकरणांपैकी १,२५४ खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले. यामध्ये दहा ते वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जुन्या प्रकरणांचाही समावेश आहे. तडजोडीतून एक कोटी तीन लाख सहा हजार ८६८ रुपयांची वसुली झाली.